Jio Free AI Course 2026: Registration, Syllabus आणि Certificate कसे मिळवायचे?

Jio Free AI Course 2026 – मोफत AI कोर्स

 Jio ने "AI Classroom Foundation Course" नावाचा मोफत AI कोर्स सुरू केला आहे. JioPC आणि Jio Institute यांच्या माध्यमातून हा कोर्स शिकता येतो.

या कोर्सचा उद्देश साधा आहे — सामान्य माणसाला AI समजावं, आणि तो रोजच्या आयुष्यात व कामात कसा वापरायचा हे शिकवणं. सुरुवातीपासूनच AI tools कसे वापरायचे हे सोप्या पद्धतीने शिकवले जाते. त्यामुळे हा कोर्स करण्यासाठी आधीपासून AI चे ज्ञान असण्याची गरज नाही.

हा कोर्स विद्यार्थी, नोकरी करणारे आणि AI शिकू इच्छिणाऱ्या लोकांसाठी उपयोगी आहे. मात्र, तो सध्या फक्त PC किंवा laptop वरच करता येतो. मोबाईलवर हा कोर्स करता येत नाही.

आणि हो, हा कोर्स खरंच मोफत आहे — कोणतंही fee भरावं लागत नाही.

Jio Free AI Course – थोडक्यात माहिती

तपशीलमाहिती
कोर्सचे नाव (Course Name)AI Classroom Foundation Course
प्रदाता (Provider)Jio Institute + JioPC
शुल्क (Fee)मोफत
कालावधी (Duration)४ आठवडे
पातळी (Level)Beginner (प्राथमिक स्तर)
भाषा१२ भाषा (मराठीसह)
प्रमाणपत्र (Certificate)JioPC वापरून पूर्ण केल्यास Jio Institute Certificate, अन्यथा Completion Badge

Jio AI Course मध्ये काय शिकायला मिळते?

या कोर्समध्ये AI चा रोजच्या कामात उपयोग कसा करायचा हे शिकवले जाते.

  • AI Basics — AI म्हणजे काय आणि तो कशासाठी वापरता येतो हे समजते.
  • Generative AI —  AI च्या मदतीने मजकूर आणि फोटो तयार करण्याची माहिती मिळते.
  • Prompt Writing  AI ला योग्य सूचना देऊन चांगले उत्तर कसे मिळवायचे हे शिकता येते.
  • ChatGPT आणि Gemini — या AI tools चा वापर करून प्रत्यक्ष सराव करता येतो.
  • इतर AI Tools — NotebookLM आणि Adobe Express सारख्या tools ची ओळख होते.
  • Practical Project — शिकलेल्या गोष्टी वापरून शेवटी एक छोटा project करावा लागतो.

आठवड्यानुसार Jio AI Course Syllabus

आठवडा १ — AI ची ओळख आणि Prompt Writing

पहिल्या आठवड्यात AI म्हणजे काय, त्याचा उपयोग कुठे होतो आणि AI कडून योग्य उत्तर मिळवण्यासाठी Prompt कसा लिहायचा याची सुरुवात होते.

आठवडा २ — Learning आणि Creative कामांसाठी AI

या भागात अभ्यास, माहिती शोधणे आणि वेगवेगळ्या Creative कामांसाठी AI चा उपयोग कसा करता येतो हे समजते.

आठवडा ३ — काम आणि Communication मध्ये AI

AI च्या मदतीने काम सोपे करणे, माहिती व्यवस्थित मांडणे आणि Communication संबंधित कामे अधिक प्रभावीपणे कशी करता येतात यावर लक्ष दिले जाते.

आठवडा ४ — Practical AI Project

शेवटच्या आठवड्यात आधी शिकलेल्या गोष्टींचा प्रत्यक्ष वापर करून एक छोटा AI Project पूर्ण करायचा असतो.

Jio Free AI Course Registration कसे करायचे?

Registration ची पद्धत सोपी आहे:

१. Official Jio AI Classroom page उघडा — jio.com वरच्या AI Classroom पेजवर जा.

२. Register करा — "Register For Free" या बटणावर क्लिक करा.

३. आवश्यक माहिती भरा — Registration form मध्ये मागितलेली आवश्यक माहिती भरा.

४. Course access करा — नोंदणी पूर्ण झाल्यानंतर course सुरू करा.

५. Learning सुरू करा — Registration पूर्ण केल्यानंतर तुम्ही तुमच्या सोयीनुसार course सुरू करू शकता.

Jio AI Course किती दिवसांचा आहे?

हा कोर्स ४ आठवड्यांचा आहे. प्रत्येक आठवड्यात नवीन भाग शिकायला मिळतो.

  • दर आठवड्याला नवीन module उघडतो.
  • प्रत्येक module मध्ये video lessons आणि reference material असतं.
  • पुढचा module सुरू करण्याआधी त्या आठवड्याचा quiz पूर्ण करावा लागतो.
  • शेवटी शिकलेल्या गोष्टींचा वापर करून एक छोटा project पूर्ण करायचा असतो.

कोर्स स्वतःच्या वेळेनुसार (self-paced) करता येतो, त्यामुळे रोज ठराविक वेळ देणं गरजेचं नाही.

Jio AI Course Certificate मिळते का?

हो, पण Certificate मिळण्यासाठी एक गोष्ट लक्षात ठेवावी लागेल:

  • कोर्स पूर्ण केल्यावर तुम्हाला Completion Badge मिळतो.
  • JioPC वर कोर्स पूर्ण केल्यास Jio Institute चे Certificate मिळते.
  • JioPC App चे पात्र subscribers ना १२ महिन्यांचा अतिरिक्त learning period आणि काही अतिरिक्त AI resources मिळतात.

Jio AI Course Marathi मध्ये आहे का?

हो, हा कोर्स मराठीतही करता येतो. यामध्ये एकूण १२ भाषा उपलब्ध आहेत, त्यामुळे इंग्रजीची अडचण असणाऱ्यांनाही त्यांच्या सोयीच्या भाषेत AI शिकता येते.

Jio AI Course – महत्त्वाचे प्रश्न

१. Jio AI Course करण्यासाठी laptop किंवा PC आवश्यक आहे का?

हो. हा course laptop किंवा PC वर करता येतो.

२. Registration केल्यानंतर course लगेच सुरू करता येतो का?

हो. Registration झाल्यावर तुम्ही course सुरू करू शकता.

३. Jio AI Course मध्ये quiz आणि final project असतो का?

हो. Course मध्ये quiz असतो आणि शेवटी final project करावा लागतो.

टिप्पणी पोस्ट करा

थोडे नवीन जरा जुने